Recipes
➠ चिली पनीर
➠साहित्य :2 वाट्या पनीरचे लांब तुकडे, 2 कांदे, 2 इंच आलं, 8 लसूण पाकळ्या, 1 ढब्बू मिरजी, 6 हिरव्या मिरच्या 1 चमचा कॉर्नफ्लॉअर, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, 1 चमचा व्हिनेगर, मीठ व तेल.
➠ कृती :
तेलात पनीर तळा. उभी चिरलेली ढब्बू मिरची तळून काढा. उरलेल्या तेलात कांदा, आलं, लसूण पेस्ट एकत्र परता. वास सुटल्यावर पनीर, पाण्यात घोळलेला कॉर्नफ्लॉअर, सर्व सॉस, व्हिनेगर एकत्र करून पनीरवर ओता.शेवटी ढब्बू मिरच्यांचे स्लाइस व चिरलेली हिरवी मिरची घाला.
➠ चोकोहॉपर
➠ साहित्य२ चमचे कंडेन्स्ड मिल्क, पाव कप, जाड क्रीम, अर्धा चमचा पुदिना इसेन्स, २ चमचे चॉकलेट सिरप, अर्धा कप कॉफी, अर्धा कप फेटलेलं क्रीम
➠ कृती
एका भांड्यात कंडेन्स्ड मिल्क, जाड क्रीम आणि पुदिन्याचा इसेन्स एकत्र करा. चमच्याने लहानशा ग्लासमध्ये थोडंसं चॉकलेट सिरप भरा. पण अर्धा ग्लासच. आता यावर चमच्याने हळू हळू कॉफी ओता. वरून फेटलेलं क्रीम भरा आणि सर्व्ह करा.
➡मैदा धिरडं
➠ साहित्य :- एक वाटी मैदा, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, एक चमचा तेल, अर्धा चमचा फ्रुट सॉल्ट, दोन वाटया पाणी, कसूरी मेथी एक मोठा चमचा, अर्धा चमचा जाडसर मिरपूड, चवीनुसार मीठ .➠ कृती :- फ्रुट सॉल्ट सोडून इतर गोष्टी एकत्र कराव्या . धिरडं करण्यासाठी बीडचा किंवा जाड लोखंडाचा तवा तापत ठेवावा .
तवा तापला की नारळाची शेंडी किंवा चिंधीनं तव्याला तेल लावून घ्यावं . एक चमचाभर पीठ घालून व ऐनवेळी फ्रुट सॉल्ट मिसळून पीठ तव्यावर पसरून किंचित तेल सोडून झाकण ठेवावं .
चर्र आवाज आला की धिरडं उलटावं . नीट उलटलं गेलं आणि जरा जाड वाटलं तर थोडं पाणी घाला .
एकदा जमलं की तवाभर धिरडं करता येतं .
एकदा जमलं की तवाभर धिरडं करता येतं .
➡व्हेज मंचुरियन
➠ साहित्य:-
दीड वाटी कोबी, बारीक चिरलेला, १/४ वाटी चिरलेला कांदा, २/३ वाटी किसलेले गाजर, १ चमचा कॉर्न फ्लोअर,
२ लसूण पाकळ्या, बारीक चिरून, २-१/२ चमचे मैदा, २ मध्यम हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मीठ, मिरपूड, तेल
२ लसूण पाकळ्या, बारीक चिरून, २-१/२ चमचे मैदा, २ मध्यम हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मीठ, मिरपूड, तेल
➠ ग्रेव्हीचे साहित्य:-
७ ते ८ लसूण पाकळ्या, बारीक चिरून, ४ ते ५ मध्यम हिरव्या मिरच्या, बारीक चिरून, १/२ चमचा सोया सॉस,
१ चमचा टोमॅटो सॉस, चवीनुसार चिली सॉस, १/२ वाटी पाणी, अर्धा इंच किसलेलं आलं,
१ वाटी पाण्यामध्ये १/२ चमचा कॉर्नफ्लोअर एकत्र करून, १ चमचा तेल, १ चिमूटभर साखर, मीठ, कोथिंबिर
१ चमचा टोमॅटो सॉस, चवीनुसार चिली सॉस, १/२ वाटी पाणी, अर्धा इंच किसलेलं आलं,
१ वाटी पाण्यामध्ये १/२ चमचा कॉर्नफ्लोअर एकत्र करून, १ चमचा तेल, १ चिमूटभर साखर, मीठ, कोथिंबिर
➠ कृती:-
कोबी, गाजर, कांदा, मैदा, कॉर्नफ्लोअर, लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ आणि मिरपूड सर्व साहित्य एकत्र करावे.
मिश्रणाचे लहान-लहान गोळे करावे. मिश्रणामध्ये असणाऱ्या भाज्यांना पाणी सुटते,
त्यामुळे गोळे तयार करताना त्यामध्ये पाणी घालू नये.पॅनमध्ये तेल गरम करून गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे.
मिश्रणाचे लहान-लहान गोळे करावे. मिश्रणामध्ये असणाऱ्या भाज्यांना पाणी सुटते,
त्यामुळे गोळे तयार करताना त्यामध्ये पाणी घालू नये.पॅनमध्ये तेल गरम करून गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे.
➠ ग्रेव्हीची कृती:-
एका कढईत तेल गरम करून त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस घालावे.
हे मिश्रण मोठ्या आचेवर शिजवून घ्यावे.मिश्रणात कॉर्नफ्लोअर घालावे.
मिश्रण उकळू लागले कि त्यामध्ये साखर, मीठ आणि कोथिंबिर घालावी.
मिश्रणाला उकळी फुटली की मध्यम आचेवर २ मिनिटे शिजवून घ्यावे.आता तयार केलेले मांचुरियन गोळे घालून मिश्रण २-३ मिनिटे शिजवावे.
( सर्व्ह करण्याच्या थोडा वेळ अगोदर गोळे घालावेत.)
एका डिश मध्ये तयार गरम बॉल्स घेऊन त्यावर गरम ग्रेव्ही घालावी.
➡प्रेशर कूकरमधील केक

➠साहित्य:-
३/४ कप मैदा, २५० ते ३०० ग्राम कंडेन्स मिल्क (१/२ ते ३/४ कप ), १/४ कप बटर (मिठविरहित),
१/२ टिस्पून बेकिंग पावडर, १/२ टिस्पून बेकिंग सोडा, १/२ टिस्पून वनिला इसेंस, १/२ कप प्यायचा सोडा (सोडा वॉटर)
१/२ टिस्पून बेकिंग पावडर, १/२ टिस्पून बेकिंग सोडा, १/२ टिस्पून वनिला इसेंस, १/२ कप प्यायचा सोडा (सोडा वॉटर)
➠कृती:-
१) प्रेशर कूकरमधील रींग आणि शिट्टी काढून ठेवावी. आणि प्रेशर कूकर झाकण लावून मोठ्या आचेवर गरम करण्यास ठेवावा.
साधारण ८ ते १० मिनीटे गरम करावा. कूकरमध्ये पाणी घालू नये. कोरडाच गरम करावा.
२) नंतर मैदा, बेकिंग सोडा, आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळून घ्यावे.
जर बेकिंग पावडरचे लहान गोळे असतील तर ते मोडून घ्यावे. केकटीनला आतून बटरचे कोटींग करावे.
३) एका खोलगट मध्यम बाऊलमध्ये मऊ झालेले बटर आणि कंडेन्स मिल्क एकत्र करावे.
हॅंड मिक्सरने व्यवस्थित फेटून घ्यावे. बॅटर एकजिव झाले कि त्यात एकूण मैद्यापैकी १/२ भाग मैदा आणि १/२ भाग सोडा वॉटर घालून हॅंड मिक्सरने फेटून घ्यावे.
४)पिठाच्या गुठळ्या राहू देवू नयेत. नंतर उरलेला मैदा आणि सोडा वॉटर, तसेच वनिला इसेंस घालून परत फेटावे.
गरजेपुरतेच बॅटर एकदम स्मूथ होईस्तोवर फेटावे. खुप जास्त फेटल्याने केक मध्यभागी सिंक होतो.
५) तयार बॅटर केक टीनमध्ये ओतावे. अतिरीक्त हवेचे बुडबूडे निघून जाण्यासाठी, केक टीन ओट्यावर हलकेच ठोकावा (३-४ वेळा).
कूकरची आच मध्यम करावी. गरम कूकरचे झाकण उघडून त्यात पकडीच्या सहाय्याने केकटीन ठेवावा.
झाकण लावावे आणि ३५ ते ४० मिनीटे केक बेक करावा. २५ मिनीटे होईस्तोवर कूकर अजिबात उघडू नये.
बेकिग करताना मधेमधे झाकण उघडल्यास कूकरच्या आतील तापमान कमी होते व पदार्थ हवा तसा बेक होत नाही.
६) साधारण २५ मिनीटांनी कूकरचे झाकण उघडावे. आता केक फुललेला दिसेल पण आतून शिजला नसावा.
तरीही मध्यभागी टूथपिकने टोचून पाहावे, जर ओलसर बॅटर लागले असेल तर अजून १०-१२ मिनीटे केक बेक होवू द्यावा.
७) १०-१२ मिनीटांनी टूथेपिकने मध्यभागी टोचून पाहावे. जर टूथपिकला ओलसर बॅटर लागले नसेल आणि टूथपिक क्लिन बाहेर आली तर केक बेक झाला असे समजावे.
केकटीन पकडीच्या सहाय्याने बाहेर काढावा.
५ मिनीटांनी डब्याच्या बाहेर काढून जाळीवर काढून ठेवावा. गार झाला कि सुरीने कापून सर्व्ह करावा.
➡थालीपीठ

➠साहित्य:- ज्वारीचं पीठ - ३ वाट्या, बेसन /चणाडाळीचं पीठ - १ वाटी, लाल तिखट/ बारीक चिरलेली हिरवी मिरची - चवीनुसार
मीठ - चवीनुसार, जिरे - चिमूटभर, ओवा - चिमूटभर, तीळ - चिमूटभर, हळद - चिमूटभर
धणेपूड - थोडीशी, कोथिंबीर - बारीक चिरून, कांदे बारीक चिरून - २, टोमॅटो - १ बारीक चिरून, तेल
➠कृती:-
१) एका परातीत वरील सर्व साहित्य एकत्र करावे तेल सोडून, पाणी टाकून पीठ मळून घ्यावे.
२) साधारण थालीपीठाला भिवतो तसे छान मऊ थापले जाईल असे मळावे
गोळा झाल्यांनतर तेलाचा हात लावून परत एकदा मळावे३) नॉन स्टिक पसरत भांड्यात कडेने सर्व बाजुंनी थोडेसे तेल सोडावे.गोलाकार थालीपिठे थापून घ्यावीत.
४) थापून झाल्यानंतर त्याला ४-५ छिद्रे पडून त्यात थोडेसे तेल सोडावे.
५) दोन्ही भिजुनी खरपूस ,खमंग आणि थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घ्यावे
६) भाजल्यानंतर ताटात काढून ताज्या दह्याबरोबर खावे
➡मूग डाळीचा हलवा
➠साहित्य:- १ वाटी मूग डाळ, १/२ कप खवा, ३/४ कप गरम दूध, ३/४ - १ कप गरम पाणी
३/४ वाटी साजूक तूप, ३/४ वाटी साखर, १/२ टिस्पून वेलची पूड, ५-६ बदाम
➠कृती:-
१) मूग डाळ मंद आचेवर गुलाबी-लालसर रंग येईपर्यंत भाजावी. डाळ एकसारखी भाजली गेली पाहिजे.
२) डाळ कोमट झाली की मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावी.
३) खवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
४)आता कढईत तूप गरम करून भरडलेली मुगडाळ त्यात परतून घ्यावी. केशरी रंग येईपर्यंत परतावे.
५)नंतर गरम दूध थोडे थोडे घालून परतावे व मंद आचेवर वाफ काढावी.
६) नंतर गरम पाण्याचा हबका मारून परतत राहावे. डाळीचा रवा पूर्ण शिजेपर्यंत वाफ काढावी.
७) डाळीचा राव फुलून आला की त्यात खवा, साखर आणि वेलचीपूड घालावी.सर्व नीट मिक्स करून एक वाफ काढावी
८) गरमागरम हलवा बदामाचे काप किंवा किस घालून सर्व्ह करा.

➡फोडणीचे खमंग डोसे
➠साहित्य:- एक वाटी तांदळाचे पिठ , अर्धी वाटी रवा , पाऊणवाटी दही , चवीपुरते मिठ ,
तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल , एक चमचा मोहरी , एक चमचा जीरे ,चवीनुसार दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे ,
५-६ कढीपत्त्याची पाने.
➠कृती:- प्रथम एका पातेल्यात तांदळाचे पिठ, रवा, दही व मिठ एकत्र करून घ्यावे.
डोश्याला लागेल एवढे पाणी टाकून पिठ पातळ करून ठेवावे.गॅसवर एका मोठ्या कढल्यात तडका फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात मोहरी व
जिरे टाकून दोन्ही चांगले तड तडल्यावर त्यात हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे ,
५-६ कढीपत्त्याची पाने घालून २-३ मिनिटे चांगले परतून घावे आणि ही तडका फोडणी ह्या पातळ पिठावर टाकून १० मिनीटे झाकून ठेवावे.
आता नॉनस्टीक पॅनवर डोशाचे मिश्रण पसरवून दोन्ही बाजूने परतवून डोसे बनवून घ्यावेत.
हे डोसे चटणी/सॉस सोबत सर्व करा.
➡ पनीर कढाई
➠साहित्य:- २५० ग्राम ताजे पनीर , २ कप उभे चिरलेले कांदे, १ टेस्पून आलेपेस्ट, १ टेस्पून लसूण पेस्ट
दिड कप टोमॅटो प्युरी, १ टेस्पून लाल तिखट, १ टिस्पून गरम मसाला, २ टेस्पून तेल, २ सुक्या लाल मिरच्या
१ तमालपत्र, १ दालचिनी, ५-६ मिरे, १ टिस्पून धणे, २ वेलची, ३-४ लवंगा, १/४ कप चिरलेली कोथिंबीर

प्रथम कढईत तेल गरम करावे. त्यात क्रमाने सुक्या मिरच्या, तमालपत्र, दालचिनी, मिरं, धणे, वेलची, लवंग घालावे.
मध्यम आचेवर मसाल्याचा छान वास सुटेपर्यंत परतावे. नंतर त्यात चिरलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट घालावी. आणि परतावे.
चवीपुरते मिठ घालावे.
कांदा चांगला परतला गेला कि त्यात टोमॅटो प्युरी, लाल तिखट आणि गरम मसाला घालावा आणि ढवळावे.
कांदा चांगला परतला गेला कि त्यात टोमॅटो प्युरी, लाल तिखट आणि गरम मसाला घालावा आणि ढवळावे.
एक उकळी आल्यावर पनीरचे चौकोनी तुकडे घालून मध्यम आचेवर गरम करावे. हलक्या हाताने ढवळावे जेणेकरून पनीर फुटणार नाही.
➡ पालक पनीर
➠साहित्य:- ५० ग्रॅम पनीर , १ जुडी पालक - अंदाजे २०० ग्रॅम, १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट, १/२ कप किसलेला / बारीक चिरलेला कांदा
➡ पालक पनीर
➠साहित्य:- ५० ग्रॅम पनीर , १ जुडी पालक - अंदाजे २०० ग्रॅम, १ टीस्पून आलं-लसूण पेस्ट, १/२ कप किसलेला / बारीक चिरलेला कांदा
२ चिमुट गरम मसाला, १-२ हिरव्या मिरच्या, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून धनेपूड, १/४ टीस्पून जिरेपूड
१/४ टीस्पून आमचूर, १ टेबलस्पून दही, १ टेबलस्पून चीज , २ टेबलस्पून तेल,मीठ चवीप्रमाणे
➠कृती:-
१. पालकाची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत .
२. गरजेनुसार पाणी पातेल्यात उकळायला ठेवा. पाणी उकळले कि त्यात पालकाची पाने घाला. चिमुटभर मीठ घाला. ४ ते ५ मिनिटे पाने पाण्यात शिजू द्या.
३. शिजलेला पालक उरलेल्या पाण्या सकट आणि हिरव्या मिरच्या मिक्सर मध्ये घालून बारीक वाटून घ्या.
४. पनीरचे चौकोनी तुकडे करून ठेवा . १ चमचा बेसन किंवा तांदळाच्या पिठात २ चमचे पाणी घाला. आणि त्या मिश्रणात पनीरचे तुकडे घोळवा
आणि थोड्याश्या तेलात पनीर शालो फ्राय करून ठेवा .
५. एका पातेल्यात तेल गरम करा. त्यात आलं-लसूण पेस्ट घाला. खमंग वास सुटला कि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
६. त्यानंतर धने-जिरे पूड ,गरम मसाला आणि १/४ चमचा हळद घालून हे मिश्रण परतून घ्या .
७. मिक्सर मध्ये वाटलेला पालक घाला. आमचूर घालून एक उकळी काढा.
८. गरज्वात्ल्यास किंचित पाणी घाला.आणि मग १ टेबलस्पून दही घालून नीट ढवळून घ्या .
९. १ टेबलस्पून किसलेले चीज घाला.
१०. ह्या ग्रेवी मध्ये सर्व्ह करायच्या ५ ते १० मिनिटे आधी पनीर घाला.
खूप आधी पनीर टाकून ठेवल्यास पनीरचा लगदा होऊन पनीर मोडण्याची शक्यता असते.
nice...
ReplyDeleteI like paneer very much.......
Thanks for this recipe ......
Thanks for you comment....
Deleteoh my god like paneer chilli and i never tried paneeer chilli in entire life thanks a lot for the wonderfull paneer chilli. waiting for your next one.
ReplyDeleteThanks for your comments.....Sure we will upload
DeleteWow paneer chilly..ekdum easy recipe. Thanks. Waiting for some more.
ReplyDelete